Type Here to Get Search Results !

Date

Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा शो'चा टीव्हीला रामराम! जाणून घ्या कुठे पाहाता येणार शो

Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा शो'चा टीव्हीला रामराम! जाणून घ्या कुठे पाहाता येणार शो

Kapil Sharma Talked about show: काही दिवसांपूर्वी बंद झालेला कपिल शर्मा शो आता टेलिव्हीजनवर प्रदर्शित होणार नसल्याची माहिती स्वत: कपिल शर्माने दिली आहे. 

कपिलने सोशल मीडियावर 'द कपिल शर्मा शो'चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये कपिल नव्या घरात जाताना दिसत आहे आणि जुना फ्रिज पाहात आहे. फ्रिज पाहून कपिल म्हणतो की, 'मी सांगितले होते ना की नव्या घरात जुन्या वस्तू नको आहेत. मग हा फ्रिज इथे काय करतोय?' त्यानंतर कपिल फ्रिज उघडतो. त्या फ्रिजमधून अर्चना पूरण सिंह बाहेर येते. 

व्हिडीओमध्ये पुढे घरातील एक वस्तू तुटते. ते पाहून कपिल चिडतो आणि पाहातो की कोणाच्या हातून ही वस्तू तुटली आहे. तेव्हा तिथे राजीव ठाकूर असतात. त्यानंतर कीकू शारदा, कृष्णा अभिषेक देखील समोर येतात. या सगळ्यांपाहून कपिलची मॅनेजर म्हणते की या सगळ्यांना घराबाहेर काढायचे का? कपिल म्हणतो की घर जरी नवीन असले तरी कुटुंब जुनेच आहे. 

कपिलने हा प्रोमो शेअर करत 'फक्त घर बदलले आहे कुटुंब नाही. आता हा शो नेटफ्लिक्सवर पाहाता येणार आहे' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. कपिलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी कमेंट करत सगळ्यांकडे नेटफ्लिक्स नसते असे म्हटले आहे.


Top Story