Type Here to Get Search Results !

Date

Hritik Roshan Marriage: हृतिक रोशन लवकरच अडणार विवाहबंधनात? नव्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

Hritik Roshan Marriage: हृतिक रोशन लवकरच अडणार विवाहबंधनात? नव्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

Hritik Roshan and Saba Azad Marriage: गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन मॉडेल सबा आझादला डेट करत आहे. आता ते दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

बॉलिवूडमधील सध्याचे सर्वांचे आवडते, सतत चर्चेत असणारे कपल म्हणजे अभिनेता हृतिक रोशन आणि सबा अली खान. गेल्या काही महिन्यापासून हृतिक रोशन सबा आझाद हिला डेट करत आहे. पत्नी सुझान खानला घटस्फोट दिल्यानंतर हृतिक सबाच्या प्रेमात पडला. सोशल मीडियावर डिनर डेटला जाताना, एकत्र फिरतानाचे फोटो कायमच व्हायरल होत असतात. आता एक असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तो पाहून नेटकऱ्यानी सबा आणि हृतिक लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले आहे.

सध्या संपूर्ण देशात दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण दिवाळी जल्लोषात साजरी करताना दिसत आहेत. अनेक कलाकारांच्या घरी देखील दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात येते. नुकताच सबा आणि हृतिकने कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली आहे. एकत्र दिवाळी साजरी करतानाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

http://dlvr.it/Syrmsw

Top Story