Type Here to Get Search Results !

Date

मॅथ्यू हेडनच्या कार कलेक्शनमध्ये वाढ, खरेदी केली नवी कोरी Mahindra Scorpio-N

मॅथ्यू हेडनच्या कार कलेक्शनमध्ये वाढ, खरेदी केली नवी कोरी Mahindra Scorpio-N, पाहा

matthew hayden mahindra scorpio N: महिंद्राच्या एसयूव्ही कारला भारतातच नाही तर परदेशातही खूप लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळेच या अलिशान गाडीची भारतासह इतर देशांमध्येही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. अलीकडेच माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडननेही नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन एसयूव्हीची डिलिव्हरी घेतली आहे.

मॅथ्यू हेडन बऱ्याच काळापासून या ब्रँडशी संबंधित आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हेडन या कारची डिलिव्हरी घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियन यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे.

मॅथ्यू हेडनने महिंद्रा स्कॉर्पिओ-एनचे (Mahindra Scorpio-N) टॉप-एंड 4×4 व्हेरिएंट खरेदी केले आहे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मॅथ्यू हेडनने ब्रिस्बेनमधील डीलरशिप शोरूमला भेट दिली आहे. महिंद्रा आफ्रिकन आणि ऑस्ट्रेलियन मार्केटमध्ये अनेक मॉडेल्स ऑफर करते, विशेष म्हणजे हे मॉडेल भारतीय बाजारात सादर केले जात नाहीत.

Mahindra Scorpio-N च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, यात क्रोम इन्सर्टसह सिग्नेचर ६-स्लॅट ग्रिल आहे. लोखंडी जाळीच्या दोन्ही बाजूला नवीन एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि खाली C-आकाराचे LED DRL आहेत. बम्परच्या खालच्या भागात एयर इनटेक आहे.

सोबतच नवीन ड्युअल टोन अलॉय व्हील उपलब्ध आहेत. छतावरील रेल आणि शार्क फिन अँटेना देखील आहेत. मागील बाजूस उभ्या एलईडी टेललाइट्स आहेत, जे छताच्या स्पॉयलरपर्यंत विस्तारित आहेत. यात इंटिग्रेटेड ब्रेक लाईट देखील आहे.


Top Story