Type Here to Get Search Results !

Date

प्रिय बायको

Top Story

आपल्या प्रिय बायकोचा हात हातात घेऊन चालता चालता

तो म्हणाला, "मला एकदा तुझे बूट घालून चालायचंय."

ती म्हणाली..
"नको रे, सोपं नाही ते...
तू तुझे कष्ट झेलतोच आहेस ना,
आपला प्रवास सुखात चालला आहे ना."

त्याचा हट्ट म्हणून तिच्या बुटा मधला त्याचा प्रवास सुरु झाला.
हिरवळी वर चालता चालता
अचानक खडे टोचू लागले.

करियरसाठीचा विरोध,
नोकरीची वणवण,
लग्न ठरल्यावरची द्विधा,
माहेर सुटल्याचं दुःख,
आयुष्याचा संघर्ष,
पायाला जाणवू लागला..

गरोदर पणातील अस्वस्थता
बाळंतवेणा...
आणि नंतर तो गोंडस स्पर्श..

प्रिय बायकोचा Fast News Marathi


रात्रीची जागरण,
नोकरीतली ओढाताण...
तरीही तिने नेहमी त्याच्यासाठी
सुंदर दिसण्याचा केलेला प्रयत्न
त्याच्यासाठी वेळ काढायची धडपड,
कधी टोमणे, कधी कौतुक,
जबाबदाऱ्यांचे ओझे
जाणवत होतं थोडं थोडं

केवळ तिचे बूट घालून सुद्धा
काही अव्यक्त सल देखील आता
टोचत होते पायाला,
कधी चटके देखील बसले..

त्याने झटकन बूट काढले
म्हणाला, "कसं चाललीस एवढं?"

*ती हसली, म्हणाली, "तुझ्यासाठी... आपल्या लेकरासाठी... आपल्यासाठी...आपल्या संसारासाठी...!"