Type Here to Get Search Results !

Date

गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी, पुण्यात कोणत्या मंडळाची कधी होणार प्रतिष्ठापना? : जाणून घ्या सविस्तर

पुणे : आपल्या लाडक्या बाप्पाचे पुण्यात वाजत-गाजत आगमन होत आहे. सर्वत्र गणरायच्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. पारंपारिक पद्धतीने ढोल, ताशांच्या गजरात गणपतीच्या मिरवणुका निघाल्या आहेत. दरम्यान, पुण्यातील मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना कधी होणार जाणून घेऊयात थोडक्यात....

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळी 10:23 प्राणप्रतिष्ठापणा झाली आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा झाली आहे. दगडूशेठ गणपतीची मुख्य मंदिरापासून 8:30 वाजता निघाली. हनुमान रथातून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक काढण्यात आली.

गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी, पुण्यात कोणत्या मंडळाची कधी होणार प्रतिष्ठापना? : जाणून घ्या सविस्तर

कसबा गणपतीच्या मिरणुकीला सुरुवात

पुणे येथील मानाच्या पहिला कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पारंपारिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून श्रीची मिरवणूक निघाली आहे. कसबा गणपती पेशवेकालीन आहे. या गणपती मंदिराला सुमारे १४०० वर्षांचा इतिहास आहे. १८९३ साली कसबा पेठेतील गणेशोत्सवाला सुरुवात झाली. मानाचा पहिला गणपती असल्यामुळे विसर्जन मिरवणुकीची सुरुवात कसबा गणपतीपासूनच होतो..

रंगारी गणपती ट्रस्टचा गणपती

भारतातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मिरणुकीत ढोल, ताशांचा गजर आणि पारंपारिक पेहरावात मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मंडळाच्या श्री च्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा 11:50 वाजता होणार आहे. मंडळाने प्राणप्रतिष्ठा सोहळा ऑनलाइन केला आहे. यामुळे भाविकांना घरी बसल्या दर्शन घेता येणार आहे. भाऊ रंगारी मंडळाचे 132 वे वर्ष आहे.

पुणे पोलीस सज्ज

पुणे शहरातील गणेश उत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहे. पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सवादरम्यान शहरात 7 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी अनपेक्षित घटना लक्षात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी 1,800 सीसीटीव्ही तैनात केले आहे. यामुळे २४ तास लक्ष ठेवता येणार आहे.

Top Story